सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग, SSC वर्ष 2022 मध्ये 73,000 पेक्षा जास्त पदांची भरती करणार आहे. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभाग, संस्था आणि मंत्रालयांमधील गट क आणि ड ची रिक्त पदे भरली जातील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विविध मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा तपशील आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, बहुतांश रिक्त पदे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील विभागातील आहेत.
माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये सर्वाधिक 28,825 पदे रिक्त आहेत. यानंतर, दिल्ली पोलिसांमध्ये 7,550 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. रिक्त पदांचा अंतिम आकडा अद्याप जाहीर झाला नाही, त्यामुळे आता पदांची संख्या वाढू किंवा कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आयोग लवकरच या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करेल.
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे सचिव गौतम कुमार यांनी 30 सप्टेंबर रोजी एसएससीचे अध्यक्ष आणि सर्व मंत्रालयांना पाठवलेल्या पत्रात 73,335 रिक्त पदे भरण्याची सूचना केली आहे. आयोगाने 2022 च्या कॅलेंडरच्या बहुतेक भरतींवर जाहिराती देखील जारी केल्या आहेत.
हे पण वाचा :
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल?
औरंगाबाद येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना 30,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. आताच अर्ज करा
IRCTC मध्ये 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या
नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 67,000 पगार मिळेल
किती पदांची भरती केली जाणार –
1. कॉन्स्टेबल जीडी – 24,605 पदे,
2. संयुक्त पदवी स्तर (CGL) – 20,814 पदे
3. कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलिस – 6433 पदे
4. मल्टी टास्किंग स्टाफ – 4,682 पदे
5. उपनिरीक्षक केंद्रीय पोलीस संघटना – 4,300 पदे
6. एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा (CHSL) – 2,960 पदे