दहावी आणि ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2022 असणार आहे.
या पदांसाठी होणार भरती:
कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) –
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा :
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 25 वर्षे
उमेदवाराचा जन्म 09.11.1997 च्या आधी झालेला नसावा आणि 08.11.2004 च्या नंतर झालेला नसावा – दोन्ही तारखांचा समावेश
अर्ज फी :
सामान्य/EWS/OBC साठी: रु. 600/- (लागू कर वगळून)
SC/ST/PWBD/माजी सैनिकांसाठी: रु. 200/- (लागू कर वगळून)
पेमेंट मोड (ऑनलाइन): डेबिट कार्ड (RuPay/Visa/MasterCard/Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स/मोबाइल वॉलेट्स/UPI वापरून.
हे पण वाचा :
भारतीय विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी, त्वरित अर्ज करा
10वी असो पदवीधर.. इंडियन ऑइलमध्ये 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती
राज्यातील या ठिकाणी 7 वी पाससाठी मोठी संधी ; तब्बल 47,000 रुपये महिना पगार मिळेल
12वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये नोकरीची संधी, लवकर अर्ज करा, पगार 92000
पगार : 18,780/- – 67,390/- रुपये प्रतिमहिना
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.