लातूर : दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. तपासात मृतक हा देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर आलं आहे. मृतक अरविंद पिटले त्याच्या पत्नीसह लातूर शहरातील ठाकरे चौकात वास्तव्यास होता. मृतक हा बेपत्ता असूनही त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार का केली नाही? म्हणून संशयाची पहिली सुई पत्नीवर स्थिरावली. त्यानंतर तिला ताब्यात घेताच तिने तोंड उघडले.
देवणी तालुक्यात एका ठिकाणी कामाला असताना मृतक अरविंदची पत्नी आणि घरणी येथील रहिवाशी असलेला सुभाष शिंदे यांचा परिचय झाला. या परिचयातून सुभाष शिंदे हा अरविंदच्या घरी ये-जा करू लागला. सुभाष आणि अरविंदच्या पत्नीची भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध स्थापित झाले. गावात याची वाच्यता सुरु झाली. त्यानंतर सुभाष शिंदे गोड बोलून अरविंद आणि त्याच्या पत्नीला लातुरात घेऊन आला. त्याने दाम्पत्याला खोली करून दिली. त्यानंतर सुभाष शिंदे आणि अरविंदच्या पत्नीला अधिकच मोकळेपणा मिळाला.
हे सुद्धा वाचा..
एकनाथ खडसे यांचा रश्मी शुक्ला यांच्याबाबत गौप्यस्फोट, म्हणाले..
मुलांच्या भविष्यासाठी आताच ‘या’ योजनेत गुंतवणूक सुरु करा, 1 कोटींचा लाभ मिळेल
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; 755 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्यला मंजुरी
मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातेय.. कथित ऑडिओ क्लिपबाबत गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण
दरम्यान, आता दोघांनाही अरविंदचा अडथळा होऊ लागल्याने दोघांनी मिळून अरविंदचा काटा काढायचं ठरवलं. जेवायच्या निमित्ताने दुचाकीवर तिघेही औसा येथील एका धाब्यावर गेले. त्यानंतर बाभळगाव परिसरातील एका कॅनॉलजवळ येऊन दोघांनी मिळून अरविंदचे हातपाय बांधून गळ्यातील गमचाने गळा आवळून खून केला. त्यानंतर एका पिशवीत दगड भरून ती मयताच्या कमरेला बांधून कॅनॉलच्या पाण्यात टाकला. या घाईगडबडीत मयत अरविंदचा मोबाईल त्याच्या खिशातच राहिला. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे सोपे झाले. दरम्यात लातूर ग्रामीण पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिचा प्रियकर सुभाष शिंदे यांना अटक केली आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे दोनच दिवसांत लातूर ग्रामीण पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावलाय.