जळगाव : फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत असलेल्या वरिष्ठ पोलीस आधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट मिळाली आहे. क्लिन चिट मिळण्यापुर्वी त्या मोहित कंबोज यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला सागर बंगल्यावर गेल्या होत्या. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ज्या दिवशी रश्मी शुक्ला यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार अपेक्षेप्रमाणं रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली असल्याचे एकनाथ खडसे यांनी दिली आहे. त्यामुळं आता यावर फडणवीस काय बोलणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा..
मुलांच्या भविष्यासाठी आताच ‘या’ योजनेत गुंतवणूक सुरु करा, 1 कोटींचा लाभ मिळेल
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; 755 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्यला मंजुरी
मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातेय.. कथित ऑडिओ क्लिपबाबत गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण
पोटच्या मुलीला उसाच्या मळ्यात बांधून बेदम मारहाण, नंतर मुलीसोबत केले ‘हे’ भयंकर कृत्य
तब्बल 68 दिवस माझा फोन टॅप
तब्बल 68 दिवस माझा फोन टॅप करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. मात्र, फोन कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आलं हे कारण मला अद्यापही कळालं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच अंडरवर्ल्डच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडत होतो, त्यावेळी पाकिस्तान सौदी अरेबिया यासह इतर देशांमधून फोनवरुन तुम्हाला मारुन टाकू, संपवून टाकू अशा धमक्या देण्यात आल्याचेही खडसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली होती, तसेच स्वतः पोलिसांनी संरक्षण सुद्धा दिलं होतं असे खडसेंनी सांगितलं. मात्र, पोलिसांनी अचानक संरक्षण काढून घेतल्याचे खडसे म्हणाले.