मुंबई : मुस्लिम धर्माचे रीतिरिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते आणि मुलाचा ताबाही देत नाही, या रागातून पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली. या घटनेत जारा इक्बाल शेख (20) हिचा मृत्यू झाला असून टिळक नगर पोलिसांनी पती इकबाल मोहम्मम शेख (37) याला अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इकबाल आणि रूपाली यांनी तीन वर्षांपूर्वी आंतरधर्मीय प्रेम विवाह केला होता. रुपालीच्या कुटुंबाचा याला विरोध असल्याने त्यांनी पळून जावून लग्न केले. त्यांना दोन वर्षांचा मुलागा आहे. लग्नानंतर आंतरधर्मीय असल्याने रुपालीला मुस्लिम रीतिरिवाज जमत नव्हते. तिला बुरखा पद्धती आवडत नव्हती. मात्र वारंवार इकबाल आणि त्याचे कुटुंबिय याबाबत तिच्यावर दबाव टाकत होते. यावरून त्या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ते विभक्त झाले होते.
हे पण वाचा
शेतकऱ्यांना वीजबिलात 12 हजार रुपये अनुदान ; लाखो शेतकरी घेत आहेत लाभ
आपले पराक्रम जनतेला सुद्धा माहितीय.. गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका
महाराष्ट्रातील या खात्यात 300 जागांसाठी भरती, अर्जासाठी इतके दिवस बाकी, लवकर अर्ज करा
रुपाली तिच्या मुलासह मैत्रिणीकडे राहत होती. सोमवारी संध्याकाळी इकबाल याने रूपालीला भेटण्यासाठी चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे बोलावले. रूपाली तिथे गेली असता इकबालने तिच्यावर चाकूने वार करून पळून गेला.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रूपालीचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली असता टिळक नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयीत आरोपी इकबालला अटक केली आहे.