जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका महिला प्राध्यापिके चे सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर प्राध्यापिकेचा फोटो वापरून त्यांच्या नावाने फेक खाते तयार करून नंतर याच खात्यावरून अश्लील फोटो व्हायरल करण्यासह स्टेटसवर हे फोटो ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ताज्या बातम्या, शासकीय योजना, राजकीय घडामोडी, विशेष माहिती, क्राईम रिपोर्ट, वाचण्यासाठी ‘व्हाट्सअप गृप जॉईन करा…????????
https://chat.whatsapp.com/B6PcuupWWCt1Dic080FnZe
प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी ही घटना घडली आहे.२४ वर्षीय महिला प्राध्यापिकेच्या नावाने अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्राम या साईटवर फेक (बनावट) खाते तयार केले व फोटो वापरले. महिला व पुरुषांचे अश्लील फोटो स्टेटसवर ठेवून ओळखीच्या लोकांनाही ते पाठविले. काहीजणांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठविली. शनिवारी रात्री अज्ञात वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.