उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात सिव्हिल लाईन परिसरातील जनकपुरी परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत महिलेचे नाव पूजा असे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
सहा महिन्यापूर्वी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनकपुरी परिसरातील दीपक सोबत पूजा चे लग्न झाले होते. पूजाचे लग्नापूर्वीच टिटवी पोलीस स्टेशन परिसरातील सोनू नावाच्या एका तरुणासोबत प्रेम संबंध होते. पूजाच्या लग्नानंतर देखील हा तरूण पूजाला सतत त्रास देत असल्याने या त्रासाला कंटाळून पूजाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा :
हेलीकॉप्टर अचानक विजेच्या तारेत अडकला अन्.. अपघाताचा भयानक Video समोर
राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात कशी असणार पावसाची स्थिती?
दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती
मृत पूजाच्या आईने सांगितले की, पाच ते सहा महिन्यापासून पूजाला हा मुलगा फोन करून त्रास द्यायचा. याबाबत टिटवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तरुणाने आमच्या घरावर देखील एकदा गोळीबार केला होता. यावेळी या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्याला पुन्हा का सोडले ही बाब समजली नाही. जर पोलिसांनी त्याला सोडले नसते तर आज माझ्या मुलीचा जीव गेला नसता असा आरोप देखील त्यांनी टिटवी पोलिसांवर केला आहे.