जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या सून भाजपच्या खासदार असलेल्या रक्षा खडसे यांच्या सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले होते त्यासाठी ते दिल्लीतही गेले होते.दरम्यान एकनाथराव खडसे हे पुन्हा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करून घरवापसी करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती,अखेर खडसेनीं माध्यमासमोर याविषयी स्पष्टचं सांगितलं आहे.
काय म्हटले खडसे….
स्वतःच्या भाजपा प्रवेशावर घरवापसी संदर्भात एकनाथ खडसे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांसमोर येत या बातम्यांचं खंडण केलं आहे.’अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शहांना भेटू नये का? अमित शहा व नरेंद्र मोदींशी माझे जुने परिचय आहेत. मी त्यांना एकदा भेटलो असे नाहीए. याआधीही अनेकवेळा भेटलो आहे व यानंतरही भेटणार आहे. देवेंद्रजींना देखील भेटणार आहे. याचा अर्थ वेगळा काढू नये. मी राष्ट्रवादी मध्ये आहे. माझी सून भाजपमध्ये आहे’, असे एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
अमित शहा व एकनाथ खडसेंची प्रत्यक्ष भेट नाही
एकनाथ खडसे हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याचे स्पष्ट असलं तरि अमित शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आमची भेट होऊ शकली नाही. पण नाथा भाऊ व अमित शहा यांची फोनवर चर्चा झाली आहे.
खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या….
नाथा भाऊ भाजपमध्ये येणार की नाही याबाबत मला काही कल्पना नाही. मी भाजपमध्ये आहे आणि नाथा भाऊ राष्ट्रवादीमध्ये आहेत’, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
हे पण वाचा :