नवी दिल्ली : शेअर बाजारातील काही मल्टीबॅगर स्टॉक असे आहे ज्यांनी गेल्या काही काळात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. अशातच एका मल्टीबॅगर स्टॉकबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Jyoti Resins and Adhesives असे या स्टॉकचे नाव असून वघ्या 5 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 6,800 टक्क्यांची वाढ झाली आहे.
हे लक्षात घ्या की, 5 वर्षांपूर्वी 25 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 1,725 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. अलीकडेच कंपनीकडून गुंतवणूकदारांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्सही देण्यात आले आहेत. गुरुवारीही NSE वर हे शेअर्स 4.17 टक्क्यांनी वाढून 1,725 रुपयांवर पोहोचले.
गेल्या 1 महिन्यात यामध्ये 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 22 ऑगस्ट रोजी या शेअर्सची किंमत 1118.67 रुपये होती. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत यामध्ये 162.74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यादरम्यान तो 656.57 रुपयांवरून 1,725 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 362 टक्के इतका मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या 1 वर्षातयामध्ये 546 टक्क्यांनी वाढ पहायला मिळाली आहे. तसेच गेल्या 5 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 6,800 टक्के रिटर्न दिला आहे. 17 डिसेंबर 1993 रोजी Jyoti Resins and Adhesives ची स्थापना करण्यात आली. हे गुजरातमधील गांधीनगर येथे आहे. हे रेझिन आणि एडहेसिव्ह तयार करते.
जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 6,900,000 रुपये झाले असतील. तसेच जर एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला आता 262,729 रुपये मिळाले असतील. त्याचप्रमाणे जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 646,672 रुपये झाले असतील.