मुंबई : शेतकऱ्यांना कमी खर्चात कृषी यंत्राचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून कृषी यंत्र प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध राज्यांमध्ये त्यांच्या नियमांनुसार अनुदानाचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपकरणे/यंत्रांवर अनुदान दिले जात आहे. इच्छुक शेतकरी यासाठी अर्ज करून कृषी यंत्राच्या खरेदीवर अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सबसिडीचा लाभ दिला जात आहे. आज आम्ही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर योजनेद्वारे महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेची माहिती देत आहोत.
कृषी यांत्रिकीकरण योजना काय आहे
ही एक राज्य अर्थसहाय्यित योजना आहे जी राज्य सरकारद्वारे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी चालवली जात आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या कृषी यंत्रांवर अनुदानाचा लाभ दिला जातो. याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी वापरासाठी वापरल्या जाणाऱ्याकृषी अवजारांवर अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अर्ज करून शेतकरी अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.
ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 पात्रता
शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक.
फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
७/१२ उतारा
८ अ दाखला
खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
स्वयं घोषणापत्र
हे पण वाचा :
मोठी बातमी : NIA ची देशभरात छापेमारी ; जळगावतून एकाला अटक
‘या’ शेतकऱ्यांना सरकार देणार दरमहा 3000 रुपये; आताच बघा तुम्हाला लाभ मिळेल की नाही
पदवी पाससाठी खुशखबर.. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 रिक्त पदांची भरती
प्रवाशांनो लक्ष द्या : ऐन नवरात्रोत्सवात भुसावळमधून धावणाऱ्या तब्बल 32 गाड्या रद्द
पूर्वसंमती पत्र
तुम्हाला जर ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 साठी अर्ज करायचा असेल तर तो ऑनलाइन पद्धतीने तुम्ही करू शकता महाराष्ट्र सरकारच्या MahaDBT पोर्टल च्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत आम्ही पुढे दिली आहे.
सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकार च्या महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल, नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
मुखपृष्ठावर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी किंवा New Registration या लिंक वर क्लिक करावे लागेल.
नोंदणी करतांना तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल, पासवर्ड इत्यादि टाकून Register या बटन वर क्लिक करावे लागेल.
नंतर तुमचे Registration प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला LogIn या बटन वर क्लिक करावे लागेल आणि तुमचा यूजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला My Scheme या बटन वर क्लिक करावे लागेल.
My Scheme मध्ये तुम्हाला Tractor Anudan Yojana 2022 या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
नंतर Apply Now या बटन वर क्लिक करावे लागेल.
पुढील पृष्ठावर तुमच्या समोर एक अर्ज उघडेल या अर्जा मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरून Apply या बटन वर क्लिक करावे लागेल. या नंतर तुम्ही अॅप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण होईल.