पाचोरा, प्रतिनिधी : राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा मा. मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे परिवाराबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत आज दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता शहरातील “शिवतीर्थ” या शिवसेना कार्यालयापासुन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पाचोरा तालुका शिवसेना – संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांचे निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत, चपला बुटांचा हार घालत सदरचा पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला.
हे पण वाचा :
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार अनुदान, असा घ्या लाभ
मोठी बातमी : NIA ची देशभरात छापेमारी ; जळगावतून एकाला अटक
‘या’ शेतकऱ्यांना सरकार देणार दरमहा 3000 रुपये; आताच बघा तुम्हाला लाभ मिळेल की नाही
पदवी पाससाठी खुशखबर.. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 रिक्त पदांची भरती
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील, मा. नगरसेवक दादाभाऊ चौधरी, दत्तात्रय जडे, खंडु सोनवणे उपशहरप्रमुख अनिल सावंत, भरत खंडेलवाल, पप्पु राजपुत, संदिप जैन, पप्पु जाधव, प्रविण मोरे, हरीष देवरे, अतुल चौधरी, संजय चौधरी, रविंद्र चौधरी, राजेंद्र राणा, अजय पाटील, अमरसिंग पाटील, अनिस अन्वर, देविदास पाटील, अनिल मराठे, विलास पाटील, प्रितेष जैन, धनराज पाटील सह शिवसेना, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तद्नंतर रामदास कदम यांच्या निषेधाचे निवेदन तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले.