जळगाव : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAने देशातील विविध राज्यात टाकलेल्या छापेमारीत १००हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. यात जळगावमधून एकाला अटक करण्यात आल्याच्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
NIA आणि ईडीने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बिहार, नवी दिल्ली आणि आसाम यासह १२ राज्यात छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात देखील २० ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. यात जळगावात टाकण्यात आलेल्या छापेमारीत एकाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो काही दिवसांपासून जळगावात लपून बसलेला होता. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय 32 , रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) असे सदर व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. 21/2022 कलम 121-A, 153-A, 120-ब, 109 भा.द.वि.सहकलम 13(1) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच हा व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा :
‘या’ शेतकऱ्यांना सरकार देणार दरमहा 3000 रुपये; आताच बघा तुम्हाला लाभ मिळेल की नाही
पदवी पाससाठी खुशखबर.. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 रिक्त पदांची भरती
प्रवाशांनो लक्ष द्या : ऐन नवरात्रोत्सवात भुसावळमधून धावणाऱ्या तब्बल 32 गाड्या रद्द
खळबळजनक ! लग्नाचं अमिष दाखवून केला तब्बल दहा वर्ष अत्याचार
मेहरूण परिसरातून ताब्यात
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे जळगावमधील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसने तिघांना ताब्यात घेतले होते. एका मशीद जवळ झोपलेले असतांना तिघांना ताब्यात घेण्यात आले. परंतू यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.