परभणी : राज्यात काहीही झालं तरी महिला अत्याचाराचे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशात लग्नाचं अमिष दाखवून एका ४४ वर्षीय महिलेवर सतत दहा वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परभणी शहरातील हाजी हमीद कॉलनी भागात घडली आहे. तसेच सदरील प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शेख सलीम शेख सादेक याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख सलीम शेख सादेक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी शहरातील हाजी हमीद कॉलनी भागात राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेला आरोपी शेख सलीम शेख सादेक याने लग्नाचे अमिष दाखवून महिलेचे दहा वर्षापासून शोषण केले. पीडित महिलेने घडलेला प्रकार कोणाला सांगू नये यासाठी आरोपी शेख सलीम शेख सादेक यांनी महिलेला थापडबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
हे पण वाचा :
खळबळजनक ! लग्नाचं अमिष दाखवून केला तब्बल दहा वर्ष अत्याचार
धक्कादायक ! पती, मुलाला बंदुकीचा धाक दाखवून महिलेचे अपहरण, नंतर बेशुद्ध करुन महिलेसोबत भयानक कांड
सोन्याच्या किमतीत विक्रमी घसरण, त्वरित जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव
वयाच्या १८ व्या वर्षापासून करा ‘हे’ काम, मोदी सरकार देणार आयुष्यभरासाठी ५ हजार रुपये
वारंवार होत असलेल्या मारहाणीला आणि अत्याचाराला कंटाळलेल्या पीडित महिलेने अखेर कोतवाली पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख सलीम शेख सादेक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर तुरनर करत आहेत. तर या अगोदर एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवून सतत बारा वर्षे अत्याचार केल्याची घटना परभणीमध्ये घडली होती. त्यात आता हा दुसरा प्रकार समोर आल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.