भुसावळ : दरवर्षी नवरात्रोत्सवात रेल्वेकडून काही विशेष आणि जनरल गाड्या चालवल्या जातात. यामुळे जागेचा प्रश्न सुटतो. मात्र, यंदा ऐन नवरात्रोत्सवात भुसावळमधून धावणाऱ्या तब्बल 32 गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कारण बिलासपूर विभागात रेल्वे प्रशासनाने चौथ्या रेल्वेमार्गाच्या जाेडणीचे काम हाती घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. २१ ते २८ सप्टेंबर याकाळात विविध गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ज्या प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांचे कन्फर्म आरक्षित तिकीट काढले आहे, ती तिकिटे आता आपोआप रद्द झाली आहेत. त्यात ऑनलाइन काढलेले तिकीट रद्द झाल्यास प्रवाशांच्या बँक खात्यावर परतावा जमा होईल. ज्यांनी तिकीट खिडकीवरून आरक्षण केले आहे, त्यांना खिडकीवर जाऊन पैसे परत मिळवता येतील.
हे पण वाचा :
खळबळजनक ! लग्नाचं अमिष दाखवून केला तब्बल दहा वर्ष अत्याचार
खळबळजनक ! लग्नाचं अमिष दाखवून केला तब्बल दहा वर्ष अत्याचार
धक्कादायक ! पती, मुलाला बंदुकीचा धाक दाखवून महिलेचे अपहरण, नंतर बेशुद्ध करुन महिलेसोबत भयानक कांड
सोन्याच्या किमतीत विक्रमी घसरण, त्वरित जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव
रद्द झालेल्या गाड्या(कंसात रद्द तारखा) :
हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-हावडा, हावडा-मुंबई मेल, मुंबई-हावडा मेल (२१ ते २८ सप्टेंबर), हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस (२२ ते २९), मुंबई-हावडा गीतांजली (२१ ते २८), शालिमार-एलटीटी व एलटीटी-शालिमार (२१ ते २८), हावडा-मुंबई दुरंताे (२३, २६, २७ व २८), मुंबई-हावडा दुरंताे (२४, २७, २८ व २९), हावडा-पुणे दुरंताे (२२, २४ व २९), पुणे-हावडा दुरंताे (२४,२६ व १ आॅक्टाेबर), हटिया-पुणे (२३ व २६), पुणे-हटिया (२५ व २८), भुवनेश्वर-एलटीटी (२२, २६ व २९), एलटीटी-भुवनेश्वर (२४, २८ व १ आॅक्टाेबर), संत्रागाची -पुणे (२४), पुणे-संत्रागाची (२६), पाेरबंदर-शालिमार (२१,२२,२८ व २९), शालिमार-पाेरबंदर (२३,२४, ३० व १ आॅक्टाेबर), मालदा टाऊन-सुरत (२४), सुरत-मालदा टाऊन (२६), एलटीटी-शालिमार (२१, २२ व २८), शालिमार-एलटीटी (२३,२४ व ३०), कामाख्य-एलटीटी (२४), एलटीटी-कामाख्य (२७), हावडा-शिर्डी (२२ व २९), शिर्डी-हावडा (२४, १ ऑक्टोबर), एलटीटी-शालिमार (२३,२४,२६ व २७), शालिमार-एलटीटी (२५,२६,२८ व २९), पुरी-एलटीटी (२७) आणि एलटीटी-पुरी २९ सप्टेंबरला रद्द आहे.