सोलापूर (महेश गायकवाड)- मातंग आणि बौद्ध समाज हा मांडीला मांडी लावून बसणारा समाज आहे, इतकेच नाही तर प्रत्येक बाबींमध्ये मिळून मिसळून राहणारा समाज आहे. जेवण खाणे देखील हे दोन समाज एकत्र करत असतात भाऊ भाऊ असल्या सारखे हे दोन समाज आहेत, परंतु या दोन समाजात फक्त रोटी बेटी व्यवहार होत नव्हता, परंतु तो देखील फकिरा दलाने मंगल विवाहाच्या निमित्ताने घडवून आणला आहे, आणि मातंग व बौद्ध समाजाला अतिशय जवळ आणण्याचे प्रचंड मोठे काम केले आहे. यामुळे फकिरा दलाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून या आगळ्या वेगळ्या मंगलमय परिणय सोहळ्याचे सर्वत्र उत्साहात स्वागत केले जात आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रोटी बेटी विचाराला अनुसरून फकीरा दलाचे सोलापूर जिल्हा प्रमुख यांनी दिनांक २० सप्टेंबर रोजी महेश मिसाळ व नेहा डोंगरे यांचा मंगल परिणय सोहळा म्हणजे मिसाळ परिवारातील पहिला विवाह होता, मातंग आणि बौद्ध जाती मधील हा आंतरजातीय विवाह फकीरा दलाचे, संघटक विशाल पारडे सर व सोलापूर जिल्हा प्रमुख जय भाऊ पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली अनावश्यक खर्चाला फाटा देत कायदेशीर रित्या संपन्न झाला.
फकीरा दलाच्या वतीने नवदांपत्यास अण्णाभाऊ साठे यांचा समग्र वांग्मय व भगवान बुद्ध व त्यांचा धम्म हे दोन ग्रंथ भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी योगायोगाने ज्येष्ठ विचारवंत प्रबुद्ध साठे व मित्र परिवार समाज बांधव उपस्थित होते. मातंग आणि बौद्ध समाजात झालेला हा पहिला रोटी बेटी व्यवहार म्हणजे या काळातील प्रचंड मोठी क्रांती असून जातीयवाद्याना दिलेली मोठी चपराक आहे,अशी भावना या दोन जातींमधील सुशिक्षित वर्गातून व्यक्त केली जात आहे.