पुणे : गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ ग्राहकांशी आपुलकीचे नाते असलेल्या महाराष्ट्रातील बँकेला आजपासून कायमस्वरूपी कुलूप लागणार आहे. नियम न पाळल्यामुळे आणि अनियमितता आढळून आल्याने आरबीआयने ऑगस्ट महिन्यात पुणे येथील रुपी सहकारी बँक लिमिटेडचा (Rupee Co-operative Bank Limited) बँकिंग परवाना रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
त्यानुसार २२ सप्टेंबर म्हणजेच आजपासून या बँकेला कायमस्वरूपी कुलूप लागणार आहे. आरबीआयने यापूर्वी ही अनेक बँका, वित्तीय संस्थांचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने राज्यातील या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता.
केंद्रीय बँकेच्या निर्णयाप्रमाणे, 22 सप्टेंबरपासून या बँकेच्या सर्व सेवा कायमस्वरुपी बंद होणार आहेत. ग्राहकांना आता कुठलाही व्यवहार करता येणार नाही. गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ या बँकेशी ग्राहकांचे आपुलकीचे नाते होते.
रुपी सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसून कमाईचे आवश्यक साधनंही नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.22 सप्टेंबरपासून या बँकेचे कामकाज बंद होईल
ग्राहकांना रक्कम काढता येणार नाही. कोणताही आर्थिक व्यवहार, धनादेश वा इतर सेवांचा लाभ घेता येणार नाही.
आता DICJC Act 1961 नुसार, गुंतवणूकदारांना 5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळेल. त्यासाठीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. ग्राहकांना त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज दाखल करावा लागणार आहे