मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आहे.
दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर 12 वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
हे संभाव्य वेळापत्रक असून निश्चित वेळापत्रकाबाबतची माहिती शाळांना दिली जाणार आहे. त्या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. कोरोनाचा प्रसार मंदावल्यानंतर आणि रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सरकारने सर्व निर्बंध शिथील केले. त्यानंतर शाळा आणि कॉलेज सुरु करण्यात आली.