अहमदनगर : आईच्या नात्याला काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेत एका आईनेच आपल्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला 50 वर्षीय परपुरूषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं. ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे.
आपल्या समाजात असं करावं लागत असल्याचं सांगून आईकडून मुलीवर दबाव टाकण्यात आला. मात्र, मुलीने नातेवाईकांना याबद्दल सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 50 वर्षीय नराधमाने अत्याचार केला. आईने धमकावल्याने भेदरलेल्या मुलीने आपल्यावर होणारा अत्याचार सहन केला. मात्र पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न झाल्यावर तिने कशीबशी आपली सोडवणूक केली आणि नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुलीची आईही या गुन्ह्यात सहभागी असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.