पुणे: अंधश्रद्धेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. येथे उच्च शिक्षित सुनेसोबत सासच्या मंडळींनी अघोरी प्रकार केला आहे. सुनेला मूल होण्यासाठी सतत तगादा लावला जात होता. यासाठी तिला मानसिकरित्या तिला त्रास देण्यात आला. तिच्यावर अघोरी प्रकार करण्यात आले.
मूल होत नसल्याचा बहाणा देत तिला काळे कपडे घालण्यासाठी विरोध दर्शवण्यात आला. सासरच्यांविरोधात पीडित सूनेनं पुणे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मूल होत नसल्याने सासरची मंडळी आणि नवरा तिला मानसिकरित्या त्रास देत होते. त्यांनी काळे कपडे घालण्यासही विरोध केला.
जर तू काळे कपडे घातले तर तुला मुलगा होणार नाही असं सासरचे मंडळी सांगत होते. या जाचाला कंटाळून अखेर पीडितेनं पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.