जळगाव,(प्रतिनिधी)- ११ सप्टेंबर २०२२ रोजी बिहारमध्ये राष्ट्रीय किसान मोर्चा आणि त्यांच्या भागीदार संघटनांकडून परिवर्तन यात्रा सुरू होती सदर परिवर्तन यात्रा एका विशिष्ट समुदायाने बंद केली. यासोबतच यात्रेत सहभागी असलेल्या अनुसूचित जातींच्या मुलभूत अधिकारांतर्गत होणारी यात्रा थांबवून जातीय सूचक शिवीगाळ करून अनुसूचित जमातीच्या लोकांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला,यात्रेत सहभागी शेतकरी, वाहनांचे नुकसान करून वाहनचालक व त्याच्या इतर साथीदारांना मॉबलिंचिंग करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बहुजन मुक्ती मोर्चा व इतर संघटनानी सुमित्र अहिरे यांच्या नेतृत्वात आज १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारीयांना निवेदन दिले. यावेळी विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या आहेत मागण्या….
प्रवास थांबवणाऱ्या सर्वांवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
यात्रेत सहभागी शेतकऱ्यांची वाहने व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. नुकसान 3. ज्यांनी शेतकर्यांना अपमानित करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर मोबलिंचिंगचा गुन्हा दाखल करावा.
खुनाचा प्रयत्न आणि ओबीसी आणि मागासवर्गीयांना अवमानित केल्याचा गुन्हा जात भेदभावाखाली दाखल करावा आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर जातीभेदाचा गुन्हा दाखल करावा.
वरील घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर योग्य कारवाईसाठी निवेदन सादर असल्याचे निवेदनात म्हटलं आहे.