सोलापूर: राज्यात एकीकडे लव्ह जिहाद विविध प्रकरणाने वातावरण ढवळून निघत असतानाच सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात हिंदू मुलगी आणि मुस्लिम पुरुषाने प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, आत्महत्यापुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. याबाबतची नोंद तालुका पोलीस ठाणे येथे झाली आहे.
सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला.ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.दोघांचे शव सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा..
RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील ‘इतके’ रुपये
अत्याचारातून गतिमंद तरुणी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना
शेतकऱ्यांनो.. PM Kisan च्या पुढील हप्त्याचे पैसे, जमा झाले की नाही तपासण्यासाठी ‘या’ नंबरवर करा कॉल
पोलिसांना मृतांकडे दोन चिठ्ठ्या आढळल्या
बीबी दारफळ येथे गळफास घेतल्याची माहिती मंगळवारी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली. यावेळी पोलिसांनी कसून तपास केला असता या प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या.त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ‘आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये’, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.