सोलापू,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस दलातुन वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले बार्शी चे भाऊसाहेब आंधळकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावे आणि त्यांच्या वर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. खा नवनीत राणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही तर राज्यभरातील सेवा निवृत्त पोलीस अधिकारी संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.