पुणे – शाळेतील १३अल्पवयीन (विदयार्थीनी) मुलींसोबत विकृत चाळे करणं शिक्षकाला चांगलेच महागात पडले असून या प्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षकाला ‘बेड्या’ ठोकल्या आहे. या शिक्षकाच्या विकृत करणाम्यामुळे शिक्षकी पेशाला काळिमा फासल्या गेल्याचं बोललं जात आहे.
पुणे मंचर येथील आंबेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बाबाजी उमाजी घोडे (रा. निमगाव सावा) याने सातवीतील अल्पवयीन १३ मुलींसोबत विकृत चाळे करून त्यांचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी शिक्षकास अटक केली आहे.
केंद्र प्रमुखांनीचं दिली तक्रार….
अल्पवयीनमुलींच्या छळ प्रकरणी केंद्रप्रमुखांनी फिर्याद दिली आहे. शिक्षक बाबाजी उमाजी घोडे (रा. निमगाव सावा) हा सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या छातीला स्पर्श करणे, खांद्यावर हात ठेवणे, अशा प्रकारे त्यांचा लैंगिक छळ करत होता. जूनपासून असा प्रकार सुरू होता.
मुलींनी पालकांना सांगितले असता, पालकांनी २४ ऑगस्ट रोजी शाळेत जाऊन तक्रार केली. शाळेने तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी संपर्क साधला. पठारे यांना काही पालकांनी फोन करून आपबीती सांगितली होती. त्यांनी समिती स्थापन करून चौकशीचा आदेश दिला होता. या समितीने मुलींशी संवाद साधत चौकशी केली. समितीने सातवीतील अठरा मुलींची चौकशी केली. त्यातील तेरा मुलींबाबत हा प्रकार घडला असल्याचे समितीच्या निदर्शनास आल्यानंतर शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.