वर्धा: महाराष्ट्रात महिलांसह मुलींवर होणारे अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच वर्धा जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आलीय. शाळेत जात असताना १३ वर्षीय विद्यार्थिनीचा चाकूच्या धाकावर अपहरण करून धावत्या कारमध्येच बलात्कार करण्यात आला. ही घटना पुलगावात घडली असून याबाबत पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली.
नेमकी काय आहे घटना?
या घटनेतील पीडित पुलगावातील विद्यार्थिनी दररोज सकाळच्या सुमारास शाळेत जाते. मंगळवारी शाळेच्या प्रवेशद्वारावर पोहचली असतानाच, सुमेध मेश्राम व अन्य एकाने तिला चाकूचा धाक दाखवून बळजबरीने कारमध्ये बसविले. नंतर धावत्या कारमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार केला. याविषयी कुणाला सांगितल्या जीवे मारण्याची धमकी दिली.
हे पण वाचा :
मृत्युच्या १२ तासानंतर मुलगी झाली जिवंत ; अंत्यसंस्काराला उपस्थित सर्वच अवाक….
वजन कमी करायचं आहे? हे अप्रतिम पेय प्या; झपाट्याने कमी होईल..
ग्राहकांसाठी खुशखबर.. जळगावात आठवडाभरात सोने-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी घसरली
लग्नाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीला पळविले, नंतर जे घडलं ते धक्कादायकच..
हादरलेल्या विद्यार्थिनीने आपल्यावरील अत्याचाराविषयी आईवडिलांना सांगितले. त्यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून सुमेध आणि गाडी चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.