पाचोरा : रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे उघडकीस आलीय. तीन महिन्यापूर्वीच या मृत विवाहितेचे लग्न झाले होते. दरम्यान, तिने आत्महत्या का केली? याबाबत अद्यापही समोर आले नसून याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची कन्या उमा नानू फादगे (वय – २०) हिचा विवाह जळगाव शहरातील प्रेमनाथ उमप यांच्याशी १८ मे २०२२ रोजी मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान, रक्षाबंधन सणानिमित्त उमा नानू फादगे ही काल शुक्रवारी माहेरी आलेली होती. रात्री उमा ही गावात वास्तव्यास असलेली तिची मावशी शिलाबाई सोमनाथ गायकवाड यांच्या घरी झोपण्यासाठी गेली होती.
आज सकाळी उमा आपल्या आईच्या घरी आल्यानंतर मला आंघोळीसाठी जायचे आहे असे सांगुन घरातील स्नानगृहाकडे गेली. दरम्यान बराच वेळ होवुन सुद्धा उमा येत नसल्याने वडिल नानू फादगे यांनी घरात शोध घेतला असता घरातील स्वयंपाक घरात उमा ही दोरीच्या सहाय्याने फाशी घेतलेल्या अवस्थेत वडिलांना आढळुन येताच वडिल नानू फादगे यांनी एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थांच्या मदतीने उमा हिस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी उमा हिस मृत घोषित केले. उमा सनी उमप या विवाहितेने आत्महत्या का केली ? यांचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही.
हे पण वाचा :
खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड
मलिक यांना झटका; समीर वानखेडेंना आणखी एका प्रकरणात क्लीन चीट
मौनी रॉयचे हॉट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल*
जळगाव जिल्हा ऑनर किलिंग च्या घटनेने हरला ; तरुणाची गोळी मारून तर तरुणीचा गळा दाबून हत्या
मयत उमा हिचे शवविच्छेदन डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस काॅन्स्टेबल राकेश खोंडे हे करित आहे.