जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाचे राजकारण चांगलेच तापलेले दिसतंय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह इतर 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप घेतला आहे.
जळगाव जिल्हा दूध संघात प्रशासक मंडळ आणि संचालक मंडळ आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. दिवसभराचा दोघांमधील हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाविरोधात सदस्य अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संचालक मंडळाविरोधात कारवाईची मागणी तक्रारीत केली आहे.
हे पण वाचा :
तरुणांनो तयारीला लागा : CAPF अंतर्गत 84405 रिक्त पदे भरण्याचा निर्णय
अबब.. जळगावात कामगारानेच लावला मालकाला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा चुना
इंडिगो विमानाचा मोठा अपघात टळला, धक्कादायक व्हिडिओ समोर
प्रेमीयुगुलांसोबत असं काही घडतं की ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
संचालक मंडळ बरखास्त असतांनाही मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील ११ संचालकांनी अनधिकृतरित्या जिल्हा दूध संघाच्या आवारात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन दूधसंघाच्या मिटींग हॉलमध्ये बैठक घेतल्याचे अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.