अकोला : अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या ‘मोर्णा डॅम’ आणि पातुर जंगल पावसामुळे खुलले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे येथील नदी-नाले, छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. डोंगरांनी हिरवा शालू पांघरला आहे. त्यामुळे काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ वातावरण अनुभवण्यासाठी तरुणाई आणि पर्यटकांचा कल वाढलाय. त्यातच हा परिसर तरुणाई आणि प्रेमीयुगुलांसाठी अत्यंत धोकादायकही ठरत आहे.
अशात तिथे फिरायला आलेली प्रेमी युगुल या निसर्गरम्य वातावरणातील एका झाडाखाली बसलेले असतात. ते त्यांच्या गप्पागोष्टींमध्ये रमलेले असताना त्यांच्यासोबत असं काही घडतं की ऐकून धक्का बसणार. त्यांच्या गोष्टी रंगत असताना काही टवाळखोर मुलं त्यांच्याजवळ येतात आणि तुम्ही कुठले, कुठून आलात, इथे काय करताय, तुमच्या घरच्यांना लागलीच इथे बोलवा, असा दम देतात.
तसेच या प्रेमीयुगुलांचे व्हिडिओ काढून त्यांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर, बदनामी पोटी तरुणाई तक्रारीसाठी पुढे येणार नाही म्हणून हे टवाळखोर त्यांचं चित्रीकरण करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.पातुर तालुक्यातील पेशाने शिक्षक असलेली व्यक्ती एका तरुणीसोबत याचं परिसरात फिरायला आला, यावेळी त्याच्यासोबत देखील हाच प्रसंग घडला. आता या शिक्षकासह त्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
हे पण वाचा :
खाण मंत्रालयात 10वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती
हिरो रात्री तीन वाजता मला…अभिनेत्री मल्लिका शेरावतचा आणखी एक गौप्यस्फोट
मनसेला दे धक्का ! माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांचा शिंदे गटात प्रवेश
..तुम्ही माझी पेन्सिल-रबरही महाग केली, पहिलीच्या विद्यार्थिनीचे पंतप्रधान मोदींना पत्र
दरम्यान, अद्याप आमच्याकडे कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. जर कोणी तक्रारीसाठी पुढे आले तर संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल. योग्य ते पाऊल उचलले जाईल, असे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितले.