नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक संधी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) द्वारे अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 455 पदांवर भरती करण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेच अर्ज दाखल करावा. अर्ज 10 ऑगस्ट 2022 पर्यंत करता येणार आहेत. या पदांवर उमेदवारांची भरती गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.
एकूण रिक्त जागा : 455
रिक्त जागांचा तपशील
फिटर : 186
टर्नर : 28
मशीनिस्ट : 26
कारपेंटर : 4
मशीनिस्ट (ग्राइंडर) : 10
इलेक्ट्रिशियन : 66
ड्रॉफ्ट्समॅन (मेकॅनिकल) : 6
इलेक्ट्रॉनिक्स (मेकॅनिक) : 8
पेंटर : 7
शीट मेटल वर्कर : 4
मेकॅनिक (मोटर व्हेइकल) : 4
कंप्यूटर ऑपरेटर (COPA) : 88
वेल्डर (गैस एवं इलेक्ट्रिक) : 8
स्टेनोग्राफर (इंग्लिश) : 6
फ्रिज/एसी मेकॅनिक : 4
हे पण वाचा :
पासपोर्ट कार्यालयात पदवीधरांना नोकरीची संधी.. ; 2.09 लाख रुपये पगार मिळेल
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!
अशी असेल निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत 455 पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. उमेदवारांचं डॉक्यूमेंट वेरिफिकेशन केलं जाईल. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांची घोषणा सप्टेंबर महिन्यात केली जाईल. आवश्यक असल्यास उमेदवाराची निवड लेखी चाचणी किंवा मुलाखतीच्या आधारे केली जाऊ शकते. अधिक तपशीलांसाठीउमेदवार अधिकृत वेबसाइट hal.india.co.in वर जाऊन संपूर्ण तपशील ऑनलाइन तपासू शकतात.