रावेर : तालुक्यातील कुसुंबा येथील अठरा वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आलीय. जा रविंद्र तायडे (वय १८, रा. कुसुंबा ता. रावेर) असे मृत तरूणीचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पूजा तायडे ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. बुधवारी २० जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातील बाथरूमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. तातडीने तिला रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
हे पण वाचा :
ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल
बँकेत नोकरीची मोठी संधी…तब्बल 6000 हून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
भरधाव ट्रेनसमोर ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला अन्…; पहा धक्कादायक Video
तरूणीचे वडील रविंद्र मधुकर तायडे यांनी देलेल्या खबरीवरुन रावेर पोलिस ठाण्यात अकास्मत मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरिक्षक दिपाली पाटील पोहेका सतीष सानप तपास करीत आहे.