भुसावळ: राज्यात एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेला धक्क्यांवर धक्के देणे सुरु असून अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेमधील एकनाथ खडसे समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा खडसे समर्थक माजी नगरसेवक अपात्र ठरले आहेत. त्यामुळे खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन भाजप लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी आपला कालावधी संपण्याच्या आधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश केला होता. यानंतर भुसावळ नगरपालिकेच्या भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी पक्ष बंदी कायद्यांतर्गत रमण भोळे यांच्यावर याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीत तत्कालीन नगराध्यक्ष तथा खडसे समर्थकांसह दहा नगरसेवकांना अपात्र ठरण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) गटाला मोठा धक्का बसला आहे.पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुसावळचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 10 नगरसेवकांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. या निकालामुळे खडसे आणि भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.
हे देखील वाचा :
अमिषा पटेलविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
खळबळजनक ! शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी, चौघांना अटक
दिशा पटानीने लावला बोल्डनेसचा तडका, काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसली खूपच ग्लॅमरस
मोठी बातमी ! सुट्या वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी मागे, पण..
काय आहे नेमके प्रकरण ?
2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर रमण भोळे, तर नगरसेवक पदावर अनुक्रमे अमोल इंगळे (प्रभाग 1 ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब) मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अॅड. बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते (22 ब), व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) हे निवडून आले होते. या लोकांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी 17 डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांच्याकडून करण्यात आली होती. आता हे 10 नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच खडसे गटाला (Eknath Khadse) मोठा धक्का बसला आहे.