मुंबई । महाविकास आघाडी कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-भाजपचे सरकार आले आहे. नवीन सरकार स्थापन होऊन दोन आठवडे झाले तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विभागांना मंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंकडून विकासकामांच्या बाबतीत निर्णय घेतले जात आहेत. त्यांनी नुकताच एक निर्णय घेतला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दणका दिला आहे. शिंदे यांनी मार्च ते जून 2022 मध्ये बारामतीत मंजूर झालेल्या नगरविकास विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी एकीकडे बारामतीतील कामांना स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र अभय दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देत नाहीत, अशी तक्रार अनेक आमदारांनी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंकडून सत्तेत आल्यावर पवारांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली जात आहे.
हे पण वाचा..
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला मोठं खिंडार? ‘हे’ दोन्ही खासदार ‘जय महाराष्ट्र’ करणार?
आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात लवकरच 30 रुपयाची घसरण होणार
प्लॅटफॉर्मवरून थेट रेल्वे रुळावर पडला, तेव्हड्यात भरधाव येत होती ट्रेन, मग….पहा व्हायरल Video
जळगावात शिवसेनेला खिंडार, पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
दरम्यान, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना 941 कोटींपैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण करण्यात आले होते. मात्र, आता बारामतीतील कामांना स्थगिती मिळाल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.