जामनेर : तालुक्यातील शेंगोळा येथे वारंवार होणा-या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने चक्क विजेचा शॉक घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.सपना शाम एखरनार (वय २७ रा. शेंगोळा ता. जामनेर) असं मयत विवाहितेचे नाव असून याप्रकरणी गुरुवारी पहूर पोलीस ठाण्यात विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सपना शाम एखरनार हिला सासरची मंडळी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. पती शाम रामदास एखनार हा दारुच्या नशेत मारहाण करायचा. याचप्रमाणे सासरे रामदास चिंतामण एखनार आणि सासू गीताबाई रामदास एखनार यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून सपनाने ६ जुलै २०२२ रोजी सकाळी ५ वाजेपुर्वी स्वत: इलेक्ट्रीक शॉक लावून आत्महत्या केली.
हे पण वाचा :
दिशा पटानीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ! एकदा फोटो पहाच
सोने खरेदीची हीच योग्य वेळ.. जाणून घ्या आजचा प्रति १० ग्रॅमचा भाव
उद्धव ठाकरेंना धक्का, औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती
अधिकारी होण्याची संधी.. MPSC मार्फत 800 पदांची भरती, ही आहे शेवटची तारीख
याप्रकरणी तिचे नातेवाईक अतुल बाजीराव भिसे (वय २५,रा. खंडवा,ता. मोताळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सपनाचे पती शाम रामदास एखनार, सासरे रामदास चिंतामण एखनार आणि सासु गीताबाई रामदास एखनार यांच्याविरुद्ध सपना हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करीत आहेत. याप्रकरणी मयत सपनाचे पती शाम रामदास एखनार व सासरे रामदास एखनार या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.