पाचोरा : आपल्याच समाजातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर लग्नास नकार देणाऱ्या आणि इतरांशीही लग्न करू देणार नाही अशी धमकी देण्यासाठी वारंवार व्हिडिओ काॅल करणाऱ्या तरुणासमोरच तरुणीचे गळफास घेतला. या तरुणीचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिव्या दिलीप जाधव (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी त्रास देणारा तरूण व त्याच्या आई यांना अटक करावी व शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन मयत तरूणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.
दिव्या दिलीप जाधव ही तिच्या आई वडीलांसह तारखेडा ता. पाचोरा जि.जळगाव येथे वास्तव्याला होती. आईवडील हात मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील निलेश मंगलसिंग गायकवाड याच्यासोबत दिव्याची ओळख निर्माण झाली होती. आणि निलेशने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार दिव्याची दिशाभूल करत होता. गेल्या दोन वर्षांपासून निलेश हा तरुणीला लग्न करणार आहे की नाही याबाबत कोणताही प्रकारचा खुलासा देत नव्हता. दोघे एकाच समाजाचे असल्याने समाजातील ज्येष्ठ मंडळींना बोलावून मुलगा निलेशसह त्याची आई लक्ष्मीबाई मंगलसिंग गायकवाड यांनाही समजविण्याचा प्रयत्न त्यावेळी केला. पण त्यांनी अश्लिल भाषा वापरून लग्नास मनाई केली.
हे पण वाचा :
राज्यात पावसाचा धुमाकूळ ! आज काय आहे पावसाचा अंदाज? जाणून घ्या
गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा
नोकरीच्या शोधात आहात का? कॉन्स्टेबल पदाच्या 1411 जागांसाठी भरती, 69 हजारापर्यंतचा पगार मिळेल
समुद्राची लाट आली अन् तिघांना घेऊन गेली, घटनेचा थरारक Video व्हायरल
इतके सगळे होऊन देखील दिव्याचे आईवडील शेतात कामाला गेल्यानंतर निलेश गायकवाड हा दिव्याला पुन्हा वारंवार फोन व व्हॉटसॲपवर चॅटींग करत होता. तसेच दोघांचे सोबतचे असलेले फोटो व कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत होता. यासर्व निलेशकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिव्याने २४ जून रोजी दुपारी ३ वाजता राहत्या घरात गळफास घेतला होता. सादर बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्याबरोबर तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. बुधवार १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दिव्याची मृत्यूशी झुंज अखेर संपली.
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता. निलेश मंगलसिंग गायकवाड आणि त्याची आई लक्ष्मीबाई मंगलसिंग गायकवाड यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा दिव्याचे आईवडील व काका यांनी घेतला. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दोघांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.