मुंबई :महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेसाठी आणखी एक शॉक देणारी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकार महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता विजेचा धक्का देणार असून विजेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीला शिंदे गटाच्या सरकारकडून मंजुरीही देखील देण्यात आली असल्याची बातमी समोर आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे गटाच्या सरकारने घेतला असून या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा वीज बिलाच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. तसंच कोणतीही दर आकारण्यात आले नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्र वीज नियंत्रण मंडळाने सांगतले आहे. या निर्णयामुळे मुंबईतील बेस्ट वीजच्या 10.5 लाख, 7 लाख टाटा पॉवर, 29 लाख अदानी इलेक्ट्रिसिटी आणि एमएसईडीसीएलच्या 2.8 कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे.
हे पण वाचा :
नोकरीच्या शोधात आहात का? कॉन्स्टेबल पदाच्या 1411 जागांसाठी भरती, 69 हजारापर्यंतचा पगार मिळेल
समुद्राची लाट आली अन् तिघांना घेऊन गेली, घटनेचा थरारक Video व्हायरल
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा, काय आहे नेमका?
पुराच्या पाण्यात प्रवाशांनी भरलेली बस अडकली, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
दरम्यान, विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ झाल्यास याचा फटका घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक परिसरातील वीज ग्राहकांवर होणार आहे.