चंद्रपूर : राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून अनेक नद्या, नालयानं पूर आला आहे. दरम्यान शॉर्टकट मारण्याच्या नादात 35 प्रवाशांनी भरलेली बस पुराच्या पाण्यात अडकली. सुदैवानं पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र त्यानंतरही बस पुराच्या पाण्यातच अडकून होती. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात ही थरारक घटना घडली.
चिंचोली मार्गे ही खासगी बस हैदराबादला जाण्यासाठी निघाली होती. ही खासगी बस मध्य प्रदेशातून हैदराबादला जायला निघाली होती. यावेळी राजुरा येथील चिंचोली नाल्याच्या पुरात ही बस बंड पडली आणि अंधारातच पुराच्या पाण्यामध्ये अडकून होती. बस पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली होती.
हे पण वाचा :
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणणाऱ्या शीतल म्हात्रेंचा शिंदे गटात प्रवेश
फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जाणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण
अरे बापरे.. भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल
बस चालकाला पुढे मार्ग बंद आहे, हे सांगितल्यानंतरही चालकानं ऐकलं नाही आणि बस पुढे नेली. अखेर सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही बस पुराच्या पाण्यात अडकली. मध्यप्रदेशातून शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातून चिंचोली मार्गे ही बस हैदराबादला जायला निघाली होती. खासगी बस पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर आता करायचं काय, असा प्रश्न निर्माण झाला होता.