मुंबई : महाराष्ट्रातील झालेल्या सत्तांतरावर शिवसेना नेते संजय राऊत सातत्यानं टीका करत आहेत. त्यांनी ‘रोखठोक’ या ‘दैनिक सामना’मध्येही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. श्री. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता सौ. अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले.
‘‘या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत.’’ काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा.
पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी सौ. अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. सौ. फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. श्री. मोदी यांचे अनुकरण त्यांच्या लोकांनी किती करावे ते पहा.
हे पण वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा, पंढरपुरात लाखों भक्तांची धाव
Video : भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग
खडसे महाविकास आघाडीत अन्.. गिरीश महाजन यांची टीका
वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले ; धक्कादायक Video समोर
श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत. बगदादचा खलिफा हरुन-अल-रशीद अनेकदा वेषांतर करून त्याच्या राज्यात रात्रीचा फिरत असे, पण तो का फिरत असे? आपल्या राज्याचे प्रशासन, सरदार प्रजेशी नीट वागत आहेत ना? प्रजेला काय समस्या आहेत? आपले राज्य नीट चालले आहे ना? राज्यकारभार करताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी; पण नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी.
हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार?’ असा खोचक सवाल संजय राऊत यांनी या लेखात विचारला आहे.