मुंबई : खारघरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे विरुध्द दिशेकडून येणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत असताना एका कार चालकाने वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवर बसवत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ कारवाईमुळे वाहनधारकाने हे टोकाचे पाऊल उचलले असून या सर्व प्रकाराची मोबाईल शूटींग केल्याने समोर आला आहे. दरम्यान, संबंधितावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाहन चालक वाहुकीचे नियम मोडून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी खारघर पोलीस वाहतूक अंमलदार नामदेव गादेकर यांनी त्याला अडवलं. मात्र MH-46, BZ 6296 ही होंडाई कंपनीच्या कारचालकाने बेदरकारपणे गाडी पोलिसांच्या अंगावर घातली. यावेळी कारचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटवर घेत फरफटत नेले.
Today I came across this horrific incidence in Kharghar. No matter what it is very inhuman to treat a traffic police like this.@CMOMaharashtra @Navimumpolice @MumbaiPolice @DGPMaharashtra pic.twitter.com/kLPhmTPG1w
— Dr Janhavi patil (@DrJanhavipatil) July 9, 2022
कारवाईच्या धास्तीने वाहनचालकाने कार थांबवलीच नाही. डिमार्ट कडे रोड जाणाऱ्या कोपरा ब्रीज ते स्वर्णा गंगा ज्वेलरी शॉप खारघर या ठिकाणा पर्यंत गाडीच्या बोनेट वर टांगून गादेकर यांना फरपटत नेले. दरम्यान, संबंधित होंडाई कार चालकाला पकडण्यासाठी पोलीस नाईक भोईर यांनी ज्यांना मदत मागितली त्या कारमधील डॉ. जान्हवी पाटील यांनी सर्व घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे. संबंधितावर कारवाईची प्रक्रिया ही सुरु आहे. खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.