मुंबई । शिवसेनेचे चिन्ह हा धनुष्यबाण असून यावरच गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दरम्यान, अशातच मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी मातोश्रीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसैनिकांनी ती चिंता सोडावी. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच मी इतक्या ठामपणे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे सांगत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंवर भाजपने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. तसंच बंडखोर आमदारांना थेट समोरा समोर येऊन बोलण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केली. तसंच मातोश्रीवर सन्मानानो बोलावलं, तर येऊ असं बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत आम्हाला आदर आहे, अशीही भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली होती. या भूमिकेवरच उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलेत.
हे पण वाचा :
खुशखबर.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भाव घसरला, चांदीही घसरली
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ; शिवसेनेचे ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर हल्लेखोराने झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर
ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप ; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा
“ज्यांनी 2019 मध्ये दिलेला शब्द मोडला. शिवसेनेचा अपमान केला. विकृत शब्दांत माझ्यावर टीका केली आणि आज तुम्ही त्यांच्याचसोबत जाऊन बसलात. हे शोभनीय आहे का?”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाला टोला लगावला आहे.
आमच्याबद्दलचं प्रेम हे अडीच वर्ष कुठे गेले होते. जे आमच्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले त्यांना मिठ्या मारताना तुम्हाला आनंद वाटत असेल तर, तुमचा आनंद तुम्हाला लखलाभ असो. मी सर्वसामान्य शिवसैनिकांसोबत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.