जळगाव,(प्रतिनिधी)- दुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेने आज जेरबंद केला आहे. गेल्या काही दिवसांपासून टू व्हीलर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतं असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर आज स्थानिक गुन्हे शाखेने या वाहन चोरणाऱ्या चोरट्यास जेरबंद केले आहे.
याबाबत सविस्तर असे की,पोलीस अधिक्षक डॉ श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे यांनी जळगांव जिल्हातील मो.सा. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेवून अटक करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पो.उप निरी. अमोल देवढे, पो. हवा / विजयसिंग पाटील, पो.हवा अनिल देशमुख, पोहवा /सुधाकर अंभोरे, पो.ना. राहुल पाटील, पो.ना. किरण चौधरी, पो.ना. प्रितम पाटील, पो.ना / प्रमोद लाडवंजारी, पोका ईश्वर पाटील व चालक पो. कॉ. प्रमोद ठाकुर यांचे पथक रवाना केलेले होते.
मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्था. गु.शा. जळगांव यांना, गुप्त बातमी मिळाली की, चाळीसगांव शहर पो.स्टे. भाग-५ गुरन १८१/२०२२ भादवि कलम ३७९ या गुन्ह्यातील गुन्हा दाखल झाले पासुन पाहीजे असलेला आरोपी नामे विकास उर्फ विक्की शिवाजी महाले हा जळगांव रेल्वे स्टेशन परीसर येथे आलेला असले बाबत माहीती त्या ठिकाणी जावून सदर आरोपी यास ताब्यात घेवून त्यास पुन्हा विश्वास घेवून विचारपुस करता त्याने जळगांव, धुळे, मालेगांव, नाशिक परीसरातून चोरी केलेल्या १२ वेगवेगळ्या कंपनिच्या अंदाजे रुपये- २,२२,०००/ किमतीच्या मो सा. मिळून आल्याने त्या तपासकामी जप्ती पंचनामा करुन जप्त करुन पुढील तपासकामी चाळीसगांव शहर पो स्टे येथे हजर करण्यात आलेले आहे. व आरोपीता कडुन आजुन मो सा. चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्याता आहे.