मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यवसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, जितेंद्र नवलानी यांना नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पोलिसांनी या आरोपांत तथ्य नसल्याचे सांगत चौकशीच बंद केली आहे. पोलिसांकडून मुंबई उच्च न्यायालयात याबाबत लेखी माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरु असलेली नवलानी यांची चौकशी गुंडाळण्यात आली आहे.
मुंबईतील व्यावसायिक जितेंद्र नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बिल्डरांकडून वसुली रैकेट चालवत असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. वर्ष 2015 ते 2021 दरम्यान नवलानी यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत जवळपास 58.96 कोटी खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. जितेंद्र नवलानी हे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत होता.
हे पण वाचा :
CCTV VIDEO : धक्कादायक ; आईच्या डोळ्यासमोर क्षणात ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
धक्कादायक ! ब्लॅकमेलींग करत मुलीवर अत्याचार ; दोन नराधमांसह मदत करणाऱ्या दोघांवर गुन्हा
नव्या सरकारचं खाटेवाटप ठरलं? कोणाच्या वाट्याला कोणती खाती येणार?
या आरोपांची चौकशी करण्याकरिता मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोनं मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. एसबीकडून जितेंद्र नवलानीविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. बुधवारी मुंबई हायकोर्टात न्या. नितीन जमादार आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.