जामनेर | अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच अल्पवयीन मुलीला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. ही धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात घडली असून याबाबत दोन नराधमांसह त्यांना मदत करणार्या इतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
जामनेर शहरात वास्तव्याला असणार्या आणि घरकाम करणार्या १७ वर्षाच्या तरूणीला तालुक्यातील तोरनाळा येथील आकाश सुरेश मुरळकर याने २ एप्रिल रोजी धमकावून बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. याप्रसंगी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. यानंतर आकाशचा मित्र तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर ) याने १२ जून २०२२ रोजी बुलढाणा येथील एका कॅफेमध्ये अत्याचार केले. याप्रसंगी देखील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
हे पण वाचा :
सई ताम्हणकरचा नवं फोटोशूट ; पाहून चाहते झाले घायाळ
‘ही’ सरकारी बँक १ ऑगस्टपासून चेक नियमात करणार बदल ; जाणून घ्या नाहीतर करू शकणार नाही व्यवहार
भारतीय नौदलमध्ये तब्बल 2800 पदांसाठी मेगा भरती ; 40000 पगार मिळेल
सदर तरूणीने ही बाब आपल्या पालकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी आकाश सुरेश मुरळकर ( रा. तोरनाळा ) आणि तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात त्यांना अजून दोघांनी मदत केली. यात एका तरूणीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब आहे. त्या तरूणीसह जामनेर येथील रहिवासी योगेश लोणारी याच्या विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.