पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण विचारही करू शकत नाही असे लहानशा घटना सुद्धा गंभीर परिणाम करू शकतात त्याचा साधा विचारही आपण करू शकत नाही अशीच एक लहानशा घटनेतून मोठा अपघात घडला आहे. एका शॉप मध्ये बसलेल्या आईच्या डोळ्या समोर खेळणाऱ्या एका ६ वर्षीय बालकाचा दृर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे घटना….
सदर घटना पुण्यातील प्रिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी येथील आहे आई एका फर्निचरच्या दुकानावर आपल्या ६ वर्षाच्या मुलासोबत गेली असतांना आई दुकानदार यांच्याशी बोलत असतांना बालक खेळत असतांना त्याच्यावर ग्राइंडिंग मशीन पडली. मशीन पडल्याने त्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटना मंगळवारी दुपारी ४ च्या दरम्यान घडली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरात एक ६ वर्षीय चिमुरडा आपल्या आईसोबत फर्निचरच्या दुकानात आला होता. त्यावेळी त्याची आई दुकान मालकाशी बोलत असताना मुलगा ग्राइंडिंग मशीनच्या जवळ गेला आणि ग्राइंडिंग मशीनला फिट केले नसल्याने ती मशीन त्याच्या अंगावर पडली.क्षणात मुलाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला आईने तात्काळ जवळच्या रुग्णालय दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.