नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्रालयाची धुरा सांभाळणारे मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. नकवी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ उद्या संपत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांचा राजीनामा आला.
विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी नक्वी यांच्या कार्यकाळाचे कौतुक केले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नक्वी यांच्याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आरसीपी सिंग यांचा कार्यकाळही वाढवण्यात आलेला नाही. त्यामुळे तेही आज राजीनामा देऊ शकतात.
नक्वी हे 2010 ते 2016 पर्यंत यूपीचे राज्यसभा सदस्य होते. 2016 मध्ये त्यांना झारखंडमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. नक्वी यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयात राज्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर 26 मे 2014 रोजी ते मोदी सरकारमध्ये अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री बनले. 12 जुलै 2016 रोजी नजमा हेपतुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अल्पसंख्याक मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार मिळाला.
हे पण वाचा :
धक्कादायक ! ब्लॅकमेलींग करत मुलीवर अत्याचार ; दोन नराधमांसह मदत करणाऱ्या दोघांवर गुन्हा
नव्या सरकारचं खाटेवाटप ठरलं? कोणाच्या वाट्याला कोणती खाती येणार?
सई ताम्हणकरचा नवं फोटोशूट ; पाहून चाहते झाले घायाळ
‘ही’ सरकारी बँक १ ऑगस्टपासून चेक नियमात करणार बदल ; जाणून घ्या नाहीतर करू शकणार नाही व्यवहार
जेव्हा भाजपने मुख्तार यांना राज्यसभेसाठी संधी दिली नाही तेव्हा सर्व प्रकारच्या राजकीय चर्चांणा सुरुवात झाली. यावेळी भाजप मुस्लिम समाजातील राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडू शकते अशी चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र पक्षाने दौपदरी मुरम यांना उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत भाजप मुख्तार अब्बास नक्वी यांना उपराष्ट्रपती बनवू शकते असेही आता बोलले जात आहे. मात्र केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचेही नाव चर्चेत आहे.