औरंगाबादः मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात घाईघाईत घेतलेल्या अनेक कामांवर शिंदे सरकारने स्थगिती आणली आहे. अशातच आता गेल्या सरकारच्या नियोजन विभागाने औरंगाबादसाठी मंजूर केलेल्या अनुदानावरच टाच आली असून प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादचा 500 कोटींचा निधीही या आदेशामुळे थांबला आहे. यात औरंगाबाद शहराचा नियमित 325 कोटींचा तसेच सुधारीत 175 कोटी असा सर्व 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. त्यामुळे आराखड्यातील प्रशासकीय मान्यता दिलेली आणि निधीसाठी शिफारस केलेली सर्व कामे आता खोळंबली आहेत. शिंदे सरकारचे खातेवाटप झाल्यावर औरंगाबादला कोणता पालकमंत्री होणार यावर सदर निधी कितपत मंजूर होईल, याचा निर्णय घेतला जाईल.
हे पण वाचा :
10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा
पुढचे 4 दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
राजकारणात आणखी एक ट्विस्ट ; शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना सोडून इतर १४ आमदारांना नोटीस
सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने घर सोडलं ; चिठ्ठीतून मोठा धक्कादायक उलगडा
3 कोटींची कामं खोळंबली
औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 3 कोटी 19 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात नावीन्यपूर्ण योजनेसाठी 9 लाख 76 हजार, वैजापूर तालुक्यात कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी 2 कोटी 84 लाख, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी 10 लाख, 24 लाख 27 हजार रुपयांचा निधी कन्नड, पैठण, औरंगाबादमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी मंजूर करण्यात आला होता. आता नवे पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत ही कामे खोळंबणार आहेत.