मुंबई,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक ‘बंड’ मानल्या जाणाऱ्या या घटनेनं देशासह इतर देशांमध्ये देखील चर्चा घडवून आणली असतांना अनेक राजकीय उलथा पालथ, घडामोडी सर्वांनीच पहिल्या आहेत, शिवसेनेची तोफ म्हणून ज्यांचा दरारा राज्यात आहे असे जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार गुलाबराव पाटील हे देखील शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया देणं टाळलं होतं, भाषण कौशल्य असणारा नेता गेल्या पंधरा दिवसापासून ‘चुप्पी’ साधून होते.शिवसेनेचे एकनिष्ठ असणारे गुलाबराव पाटील बंड केल्या नंतर आज विधिमंडळाच्या सभागृहात काय बोलतील याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून होते आज अखेर शिवसेनेचा ढाण्या वाघानं ‘चुप्पी’ सोडली आणि सभागृहा दणानून सोडलं.
नेमकं काय म्हटले गुलाबराव पाटील…
१० ते १५ आमदार बाहेर पडले तर बंड होतो आम्ही ४० आमदार आहोत ‘आम्ही बंड नाही, उठाव केला आहे’ सत्तेचं केंद्रीकरण बाळासाहेबांनी केलं आहे, टपरीवाला, रिक्षावाला, मजूरांना बाळासाहेबांनी मोठं केलंय, हिंदुत्वाचं रक्षण करणारा पक्ष म्हणजे शिवसेना , जे मिळालं ते बाबासाहेबांच्या आशीर्वादानं, हे आमच बंड नाहीय, हिंदुत्वाशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही उठाव केला आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला दूर लोटलं पण आम्ही घर सोडून आलेलो नाही. हे तुम्ही लक्षात घ्या, अस म्हणत गुलाबराव आक्रमक झाले.जेव्हा इतर पक्षाचे नेते, मंत्री राज्यभर फिरत होते तेव्हा जीव तुटत होता अशा वेळी पक्ष वाचविण्यासाठी फक्त एकनाथ शिंदे राज्यभर फिरले, आदित्य ठाकरे साहेबांचे किती दौरे झाले असाही प्रश्न त्यांनी उपस्तिथ केला.आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना दिघे, बाळासाहेबांचा आत्मा आशीर्वाद देत असेल.
आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही’. ‘तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं’, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही उठाव केला आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून चुप्पी बाळगून असलेल्या अखेर मौन सोडत सभागृह दणाणून सोडले.
तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा… असं सांगण्यात आलं
आम्ही एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर २० आमदार उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो. शिंदे काय म्हणत आहेत त्यांचं ऐकून घ्या, असं त्यांना सांगितलं. समजून घ्या अशी विनंती केली. तोपर्यंत आम्ही शिंदे साहेबांकडे गेलो नव्हतो. पण तिथल्या एका नेत्याने, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, असं आम्हाला सांगितलं, अशा शब्दात आम्हाला सांगण्यात आल्याचं गुलाबराव पाटील यांनी आज सभागृहात सांगितलं.
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आजच्या बहुमताच्या चाचणीनंतर सभागृहात बोलताना मौन सोडले. गुलाबराव पाटलांनी यावेळी आदित्य ठाकरेंसह संजय राऊत यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. कधी आक्रमक होऊन तर कधी आपल्या शायरीतून त्यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेबांनी टपरीवाल्यांना, रिक्षावाल्यांना आमदार केलं आम्ही बंड नाही, उठाव केला आहे. असं त्यांनी सभागृहात ठासून सांगितलं.
४० आमदार कसे फुटतात?
साधा मेंबर जरी फुटतो तरी आम्ही मन विचलित होते, मात्र इथं चाळीस आमदार फुटतात तेव्हा तुम्ही काय करताय? ४० आमदार फुटत आहेत, हि काही आजची आग नाहीये, आम्हाला आमचं घर सोडणं, अजिबात पटत नाहीय, बाळासाहेबांना दुःख देण्याचा, कुणाला दुःख देण्याचा इच्छा नाहीय, मात्र हे करावं लागलं.
निवडून यायची लायकी नाही, ते आमच्यावर बोलतात’
गुलाबराव पाटील सभागृहात आक्रमक होतं म्हणाले की, निवडून यायची लायकी नाही, ते आमच्यावर बोलतात. आमच्या मतांवर खासदार होतात असं म्हणत संजय राऊत यांना टोला लागवला.