मुंबई : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, आढळराव पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे या ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपांखाली आढळराव पाटील यांचे उपनेतेपद काढून घेण्यात आले होते. मात्र, आता हा आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून (Shivsena) यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.
हे पण वाचा :
गृहिणींना आणखी दिलासा मिळणार; खाद्यतेल लवकरच स्वस्त होणार
मोठी बातमी : शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील ; पुन्हा वाद पेटण्याची शक्यता
मुख्यमंत्री शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का ; घाईघाईने घेतलेल्या ‘त्या’ 600 कोटींच्या कामांना ब्रेक
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं हॉटनेसच्या ओलांडल्या सर्व मर्यादा ; पहा फोटो
आज दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सामना दैनिकामध्ये मध्ये छापून आलेली बातमी अनावधानाने छापून आलेली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेमध्येच कार्यरत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यलयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. त्यामुळे हा आदेश नेमका कोणाकडून काढण्यात आला होता, याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.