मुंबई : आज विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आता महाराष्ट्रात शिवसेना व भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. एका बाजूला मोठमोठे भाजप नेते तर दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक होता. माझ्याबरोबर आठ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. आमदारांना अनेक प्रलोभन दाखवली पण 50 जण एकत्र आले आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आमच्या संपर्कात आमदार असणारे सांगणारे एकही आमदाराचे नवा सांगू शकले नाहीत, असे म्हणत शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला.
हे पण वाचा :
ESIC मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. वेतन 67000 पासून सुरु ; जाणून घ्या पात्रता?
गृहिणींना आणखी दिलासा मिळणार; खाद्यतेल लवकरच स्वस्त होणार
मोठी बातमी : शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील ; पुन्हा वाद पेटण्याची शक्यता
शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटलांवरील कारवाईला स्थगिती
विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. यावेळी अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. तसेच अभिनंदनही केले. यावेळी ते म्हणाले की, एकीकडे सत्ता, मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा शिवसैनिक, दिघे साहेबांचा सैनिक होता. पण ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला हे आमचे भाग्य आहे. एका आमदाराला मी स्वत: चार्टर्ड विमानाने पाठवलं. त्यामुळे कोणावरही जबरदस्ती झालेली नाही.