जळगाव,(प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या पर्यावरण व वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना क्र. G.S.R.५७१ (E) दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केली आहे. यानुसार १ जुलै २०२२ पासून जळगाव जिल्ह्यात देखील एकल वापर प्लास्टीकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री, आणि वापरावर बंदी असेल असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे.
सुधारीत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नियम ४ (२) अन्वये यानुसार १ जुलै २०२२ पासून पॉलिस्टीरीन आणि विस्तारीत पॉलिस्टीरीनसह खालील सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणि वापरावर बंदी असेल. अ) प्लास्टिकच्या कांडयासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टिकच्या कांडया, प्लास्टिकचे झेंडे, कॅडी,कांडया, आईस्क्रीम कांडया.
ब) सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल).क) प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी, जसे काटे, चमचे चाकू, पिण्यासाठी स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, (स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकीटाभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे, प्लास्टिकच्या पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉन पेक्षा कमी) याबरोबरच महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ अंतर्गत खालील अतिरिक्त एकल वापर प्लास्टिकचा वापर मार्च २०१८ पासूनच प्रतिबंधित आहेत.
१. सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स) – हॅडल असलेल्या व नसलेल्या. कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून)२. सर्व प्रकारच्या नॉन- ओव्हन बॅग्स (पॉलीप्रोपिलीन पासून बनविलेले) ३. एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन- डिश, बाउल, कॅन्टेनर (डबे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगकरीता).
सदरच्या जाहीर सूचनेव्दारे सर्व उत्पादक, साठवणूकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई. कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यवसाईक आस्थापना (मॉल, मुख्य बाजार विक्री केंद्र / सिनेमा केंद्र / पर्यटन ठिकाण /शाळा/महाविद्यालय/कार्यालयीन इमारती/रुग्णालय व खाजगी संस्था ) तथा सामान्य नागरीकांना सूचित करण्यात येते की, वरील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
उपरोक्त अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारणे, उद्योग, व्यावसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे तसेच खालीलप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल.
काय होऊ शकते कारवाई…
पहिला गुन्हा घडल्यास रु.५०००/, दुसरा गुन्हा घडल्यास रु.१०,०००/ आणि तिसरा गुन्हा घडल्यास
दंडाची रक्कम रु.२५०००/-व ३ महिन्याचा कारावास अशी होणार कारवाई.
एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची सूचना.#जळगाव जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.#SingleUsePlasticban #environment #पर्यावरण@InfoDivNashik @InfoJalgaon pic.twitter.com/frW4S6PKL2
— Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव (@JalgaonDM) July 1, 2022