उस्मानाबादः ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. शिवसेनेच्या अनेक वर्षांपासूनच्या अजेंड्यावरचे हे प्रस्ताव मार्गी लागल्यामुळे एकीकडे शिवसेनेत आनंदाचं वातावरण आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचं चित्र आहे.
औरंगाबादेत काल या निर्णयाचा निषेध करत 200 काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तर आज उस्मनाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
उस्मानाबादेत शहराचं नाव धाराशिव केल्याचा वाद पेटला असून राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज असून त्यांनी याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यतक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून राजीनामे दिले.
हे पण वाचा :
सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज
दिशा पटानीचा लूक बदलला? पाहून चाहते नाराज, म्हणाले..
BECIL मध्ये या पदांसाठी बंपर रिक्त जागा, 12वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स
शिंदेंच्या शुभेच्छा जाहिरातीमध्ये उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा फोटो ; राजकीय वर्तुळात चर्चा
नामांतराला राष्ट्रवादीने मंत्री मंडळाच्या बैठकीत विरोध केला नाही. शरद पवार यांना आम्ही नेहमी साथ दिली. मात्र उस्मानाबादचे हे नामांतर मुस्लिम समाजाच्या जिव्हारी लागले आहे, अशी नाराजी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अल्पसंख्यांक प्रदेश सचिव मसुद शेख, 5 नगरसेवक, जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी सामूहिक राजीनामे दिले.