पुणे : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी राजभवनात पार पडला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. यादरम्यान, मात्र चर्चा रंगली आहे ती पुण्यातील शुभेच्छा जाहिरातीची.
या शुभेच्छा जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेसह उद्धव ठाकरे बाजूला आदित्य ठाकरे यांचा फोटो दिसून आला. यामुळे राजकीय वर्तूळात चर्चेचा विषय बनला आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारला होता. त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे.
एकदम ओक्के कार्यक्रम ???? pic.twitter.com/dupfOU77E2
— Pratik S Patil (@Liberal_India1) July 1, 2022
यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीमाना देखील द्यावा लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार म्हणून उल्लेख करत एकनाथ शिंदेसह त्या ४० आमदारांवर टीकास्त्र सोडले होते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसह शिवसेचे नाव सोडून निवडणुका लढावा असेही म्हणाले होते. मात्र शिंदे गटाकडून आम्ही शिवसैनिक असल्याचे अनेकवेळा म्हटलं गेलं. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख केल्याने अनेकनाच्या बुया उंचावल्या होत्या. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाऊन शिवसेना सोडून नवीन गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. मात्र आज सकाळ वृतांत छापून आलेल्या जाहिरातीमध्ये उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा फोटो असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.